पाटणा : वृत्तसंस्था
बहुमत चाचणीपूर्वी बिहारमधून मोठी बातमी समोर आली असून,केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आज सकाळपासून राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे दोन नेते, खासदार अश्फाक करीम आणि आमदार सुनील सिंह यांच्या घरावर छापा टाकला आहे.
पाटणातील शास्त्री नगर भागातील घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे. नोकरी घोटाळ्यातील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सुनील सिंह हे सहकारी संस्थेशी संबंधित आहेत तसेच ते RJD चे खजिनदार देखील आहेत. तर, दुसरीकडे सीबीआयचे पथक आरजेडी खासदार अशफाक करीम यांच्या घरीही पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही.
बिहारशिवाय झारखंडमध्येही सीबीआयची कारवाई सुरू आहे. बेकायदेशीर खाणकाम आणि खंडणी प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांची चौकशी केल्यानंतर केंद्रीय एजन्सीने येथे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने ज्या ठिकाणी छापे टाकले ते प्रेम प्रकाश नावाच्या व्यक्तीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.