जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील विविध पोलिस स्थानकातंर्गत सहा महिन्यापासून झालेल्या मोबाईल चोरी झालेले होते. त्यानिमित्त शहरातील विविध पोलिस स्थानकामध्ये फिर्यादींनी तक्रारी केलेल्या होत्या. आज जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकानी या सर्व 44 तक्रारदारांना मोबाईल परत मिळवून दिले आहे. याबद्दल जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांनी या पथकाचे कौतुक केले आहे.
डॉ.मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्य सहा महिन्यापासून शहरातील विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या, त्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या चोरीच्या घटनेचा तपास करून 44 तक्रारदारांना त्यांचे मोबाईल आज सकाळी परत करण्यात आले या मोबाईलची साधारण 8 ते 10 लाखांच्या आसपास असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
नागरिकांना पोलिस अधिक्षकांचे आवाहन
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईलसह किंमती वस्तू चोरीस गेली तर आपल्या जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार द्यावी, जेणेकरून मोबाईल ट्रेकींगवर ठेवून त्या मोबाईलचा तपास पोलिसांमार्फत करण्यात येईल. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांनी केले आहे.