धरणगाव : प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांविषयी सल्लागार समिती व DRUCC मेंबर प्रतिक जैन (वेस्टर्न रेल्वे) यांच्याकडून धरणगाव स्टेशन मास्तर यांना निवेदन देण्यात आले.
धरणगाव स्टेशनवर प्लॅटफॉर्मवरील बंद लाईटस संदर्भात स्टेशनबाहेरचे स्ट्रीट लाईट (धरणगाव व पाळधी) तसेच स्वच्छता, साफसफाई ,जल मंदिरावर टाकी बसविणे, स्टेशनवर नवीन वेळापत्रक बोर्ड व प्रवाशांच्या इतर सुविधा व समस्या याविषयीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी धरणगाव स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य सुनील चौधरी, अनिल महाजन, आनंद बाजपेयी, योगेश ठाकरे, किरण वाणी, अॅड संदीप सुतारे, समाधान पाटील, घनश्याम पाटील, हिमालय सिकरवार, किशोर झंवर, DRUCC मेंबर वेस्टर्न रेल्वे मुंबई प्रतिक जैन आदी उपस्थित होते.