• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2025
in जळगाव, आरोग्य, जळगाव ग्रामीण, राज्य
0
२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२५

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कावीळ आणि निमोनियाने आजारी असलेल्या २ वर्षीय चिमुकलीला रक्ताची तातडीने गरज असताना, रक्त मिळविण्यासाठी सर्वत्र धावपळ झाली. मात्र, कुठेही रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी गावाचे सरपंच प्रल्हाद चव्हाण यांना संपर्क केला. सरपंचांनी तात्काळ मदतीसाठी गिरीश भाऊ महाजन यांचे आरोग्य दूत शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या एका हाकेवर शिवाजी पाटील यांनी स्वतः रक्तदान करून बालिकेच्या उपचारास मोठी मदत केली.

रक्तासाठी सर्वत्र धावाधाव:
खुशी भानुदास चव्हाण (वय २ वर्षे) ही बालिका जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार घेत आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने रक्ताची गरज होती. रुग्णाचे नातेवाईक रक्त मिळवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करत होते, पण त्यांना रक्त उपलब्ध होत नव्हते. यामुळे त्यांनी मदतीसाठी गावचे सरपंच प्रल्हाद चव्हाण यांना संपर्क साधला.

आरोग्य दूत ठरले संकटमोचक:
सरपंच प्रल्हाद चव्हाण यांनी वेळ न दवडता, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे आणि गिरीश भाऊ महाजन यांचे आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे पै.शिवाजी पाटील यांना संपर्क केला. शिवाजी पाटील यांनीही अनेक ठिकाणी रक्तपिशवीसाठी प्रयत्न केले. मात्र, निराशाच पदरी पडत होती. अखेरीस, त्यांनी रेड क्रॉसशी संपर्क साधला असता, त्यांनी स्पष्ट केले की, “तुम्ही डोनर उपलब्ध करून द्या, तरच रक्तपुरवठा होईल.”

५६ व्यांदा रक्तदान करून वाचवले प्राण:
रेड क्रॉसच्या या मागणीनंतर क्षणाचाही विलंब न करता, या रक्तसंकटावर मात करण्यासाठी शिवाजी पाटील यांनी स्वतः तिथे जाऊन रक्तदान केले आणि एका ‘डोनर’ची भूमिका पार पाडली. विशेष म्हणजे, यापूर्वीही शिवाजी पाटील यांनी तब्बल ५५ वेळा रक्तदान करून अनेक गरजूंना जीवनदान दिले आहे, आणि हे त्यांचे ५६ वे रक्तदान ठरले. त्यांच्या या तात्काळ प्रतिसादाने आणि मानवतेच्या भावनेमुळे उपचार घेणाऱ्या बालिकेला वेळीच रक्त उपलब्ध झाले आणि तिच्या उपचारात मोठी मदत मिळाली.

कृतज्ञता व्यक्त: शिवाजी पाटील यांच्या या अमूल्य मदतीमुळे बालिकेच्या उपचारातील अडथळा दूर झाला. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवाजी पाटील यांचे आणि त्यांना मदतीसाठी प्रेरित करणारे गिरीश भाऊ महाजन यांचे विशेष आभार मानले. एका चिमुकलीसाठी गावाच्या सरपंचांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, एका आरोग्य दूताने केलेले हे ५६ वे रक्तदान खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायक आहे.

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !
राज्य

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group