• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

अमित शहा मुंबईत दाखल ;लालबागच्या राजाचे घेतले दर्शन

ठाकरेंची सत्ता उलथवण्याची रणनीती ; शहांसोबत शिंदे जाणार नाहीत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 5, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
अमित शहा मुंबईत दाखल ;लालबागच्या राजाचे घेतले दर्शन
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी रात्री ते मुंबईत दाखल झालेत. त्यांनी आज लालबाग गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यानंतर ते भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यात ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजप आपली कंबर कसताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर शहांचा हा मुंबई दौरा मानला जातो. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांनी महालक्ष्मी देवीवरील एका पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, विनोद तावडे उपस्थित होते.

शिंदे-फडणवीस शहांच्या भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहांना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. त्यासोबतच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील शहांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात शहा मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत.

शहांसोबत शिंदे जाणार नाहीत
अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या दर्शनाला जाणार नाहीत. शिंदे सुरक्षेच्या कारणास्तव दर्शनाला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. शिंदेंही अचानक हे निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लालबाग परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त करण्यात आले आहे. लालबागकडे जाणारे रस्ते देखील पूर्णपणे रिकामे पाहायला मिळत आहे.

शहांचे मराठीतून ट्विट
अमित शाह सध्या सह्याद्री अतिथीगृहावर आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. तसेच थोड्याच वेळात अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रवाना होणार आहे. लालबाग परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. स्पेशल ब्रांचचे अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, सोबतच काही अधिकारी देखील तैनात करण्यात आले आहेत. मात्र लालबागला जाण्याआधी अमित शाह यांनी मराठीतून एक ट्विट केले आहे.

गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे.

आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन.

शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल.

— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) September 5, 2022

शहांचा पहिला दौरा
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर अमित शहांचा हा पहिला दौरा आहे. मुंबई पालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी आता भाजपचा डोळा मुंबई पालिकेवर आहे. दरम्यान अमित शहा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची देखील भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
शहा आज सकाळी लालबागच्या राजाचे आणि नंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणपतीचे दर्शन घेतील आणि मेघदूत बंगल्यात भाजप प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करतील.

बैठकीत यांची उपस्थिती
शहा आज भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कोअर कमिटीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतील आणि मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करतील. त्यानंतर ते पवईला ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन करतील आणि नंतर दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

राज ठाकरेंना भेटणार
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्यावरून चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मविआ सरकार असताना ते नेहमी राज्य सरकारवर विशेषत: शिवसेनेवर हिंदुत्वावरून टिकास्त्र करायचे. त्यामुळे आता अमित शहा राज ठाकरे यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.

ठाकरेंची सत्ता उलथवण्याची रणनीती
29 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ती काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. शहांच्या मुंबई दौऱ्यानिमित्ताने मिशन मुंबईचा शुभारंभ होईल. अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या दर्शनाला येत आहेत. शहा 2017 मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले होते. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेची जबाबदारी शेलार यांच्यावर आहे. मुंबई पालिकेत 227 नगरसेवक आहेत. या वेळी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन 200’ची घोषणा केली आहे. भाजपबरोबर शिंदे गट आणि मनसेची आघाडी होण्याची शक्यता आहे.

Related Posts

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे !
जळगाव ग्रामीण

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे !

June 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
marhan

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

व्यावसायिक आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवीन मार्गांचा गांभीर्याने विचार करतील.

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group