• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पत्राचाळ प्रकरण : राऊतांच्या न्यायालयीन कोठडीतील मुक्काम १९ सप्टेंबरपर्यंत वाढला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 5, 2022
in क्राईम, राजकीय, राज्य
0
राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला…
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे.

२३ ऑगस्ट रोजी मागची सुनावणी झाली होती त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज PMLA कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली. ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली असून राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनासुद्धा अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांनी या व्यवहारात मिळालेली काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांना ईडीने 31 जुलैला ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप केला होता.

काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण?

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Related Posts

marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
marhan

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

व्यावसायिक आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवीन मार्गांचा गांभीर्याने विचार करतील.

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group