जळगाव : प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव शहर शाखा, जळगाव तालुका शाखा आणि जळगाव जिल्हा पूर्व शाखा च्या अंतर्गत काल दिनांक ४ सप्टेंबर २०२२, रविवार रोजी जळगाव शहरातील बिबानगर येथील नाना वानखेडे यांच्या घरात वर्षावास सुरू आहे.
त्या ठिकाणी मानवाचे मंगल कशात आहे या विषयावर प्रवचनकार आनंद ढिवरे यांनी प्रवचन दिले. या प्रवचनाला जिल्ह्याचे कोषाध्यक्ष बी. एस. पवार तसेच केंद्रीय शिक्षिका सुनीताताई वानखेडे उपस्थित होत्या. त्यानंतर टहाकळी या गावांमध्ये सुरू असलेल्या वर्षावास मालिकेमध्ये बापू सदावर्ते यांच्या घरी मानवाचे मंगल कशात आहे याच विषयावर प्रवचनकार आनंद ढिवरे यांनी प्रवचन दिले. येथे कोषाध्यक्ष बी. एस. पवार, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र वानखेडे, पर्यटन विभागाचे सचिव सुभाष सपकाळे उपस्थित होते. त्यानंतर खेडी या गावांमध्ये बुद्ध विहारांमध्ये सुरू असलेल्या वर्षावास मालिकेमध्ये मानवाचे मंगल कशात आहे याच विषयावर प्रवचनकार आनंद ढिवरे यांनी प्रवचन दिले. या ठिकाणी जिल्ह्याचे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र वानखेडे, पर्यटन विभागाचे सचिव सुभाष सपकाळे उपस्थित होते. त्याचबरोबर या तीनही ठिकाणी सुरू असलेल्या वर्षवास प्रवचन मालिकेमध्ये बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.