औरंगाबाद : वृत्तसंस्था
गुलाबराव पाटलांनी खोके मिळायला लागले की तो आदित्य ठाकरेंवर बोलतो, अशी एकेरी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. पण मी त्याची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे? गोधडीत पण नव्हता. आम्ही तेव्हाही शिवसेनेत होतो. याला काय अधिकार आमच्यावर टीका करण्याचा?, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी निशाणा साधताना आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. यावर चंद्रकांत खैरेंनी गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल केला आहे. गुलाबराव पाटलांनी खोके मिळायला लागले की तो आदित्य ठाकरेंवर बोलतो, अशी एकेरी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. पण मी त्याची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही. मला राग आला तर मी काहीही करू शकतो, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर चंद्रकांत खैरे यांनी नवनीत राणा यांच्यावरही टीका केली आहे. त्या बाईंनी आम्हाला हनुमंताची आणि रामाची भक्ती शिकवू नये असे म्हणत तिचे कपडे आणि सिगारेट ओढतानाचे फोटो पाहिल्यावर लोकांना त्या कशा आहेत हे समजले आहे, अशी टीकाही खैरेंनी केली.