जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका भागात राहणाऱ्या एका २० ते २२ वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित तरुणी एका महाविद्यालय पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. पंधरा दिवसापूर्वीच आईचे आजारपणामुळे निधन झाले. वडील एका ठिकाणी कामाला आहेत. १ सप्टेबर रोजी वडिलांची रात्रपाळी ड्युटी असल्याने ते कामावर गेले होते तर पीडिता एकटीच घरी होती. विनोद सुकलाल भोळे याच्याशी पीडित कुटुंबाचे घरोब्याचे संबंध असल्याने येणंजाणं सुरु होते. या काळात त्याची पत्नी व दोन मुलं गावाला गेलेले होते. त्यामुळे पीडितेकडून त्याला जेवणाचा डबा मिळत होता.
१ सप्टेबर रोजी रात्री ११ वाजता भोळे हा पीडितेच्या घरी गेला. दरवाजा उघडायला लावला. घरात आल्यावर चाकूचा धाक दाखवून बाहेर निर्मनुष्यस्थळी घेऊन गेला. तेथे अंधार असल्याने तेथून तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. घरात दोन वेळा त्याने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर एक तासाने तरुणीची सुटका केली. यावेळी त्याने डाव्या हातावर चाकू मारल्याने दुखापत झाली. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तरुणीने मंगळवारी शनीपेठ पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली. त्यानुसार भोळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.