जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोली पिंप्री येथील श्री विठ्ठल रुख्मीनी मंदीरात गणेशोस्तवानिमित्त दि ७ रोजी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.
सविस्तर वृत्त असे की, चिंचोली पिंप्री येथील श्री विठ्ठल रुख्मीनी मंदीर येथे श्री गणेश उत्सवानिमित्त गावातील ३२ पुरुष व 4 महिलांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे आयोजन आदर्श गावातील माजी सरपंच विनोद दगडु चौधरी, डॉ.संजीव दगडु चौधरी यांनी केले.
या वेळी जळगाव येथील रेड कॉस मार्फत रक्त संकलन केले गेले असून रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्यामुळे गावातील रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे कौतुक केले जात आहे. याठिकाणी गावाचे पो.पाटील वसंत लोखंडे तसेच ग्रामपंचायत सदस्य संदीप साळवे, पत्रकार विनोद सोमवंशी, अमोल सपाटे,निखिल पाटील, सिमा बाई, संजीव चौधरी,अजय गायकवाड ,यांनी रक्तदान शिबीरात रक्तदान केले असून सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात ले तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला.