जळगाव : प्रतिनिधी
विसर्जन मिरवणुकीवेळी शांतता राहावी, याकरिता एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील १८ गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश काढण्यात आलेले आहेत.
एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील यातील १८ गुन्हेगारांपासून शहरातील शांततेस धोका निर्माण हाेत असल्याबाबतच अहवाल उपविभागीय अधिकारी सुधळकर यांना देण्यात आला हाेता. त्यांनी १८ जणांना हद्दपार करण्याचे काढले आहेत. यात टिनू उर्फ अरुण भीमराव गाेसावी (कासमवाडी), अफजलखान रशिदखान फावड्या (तांबापुरा), उदय रमेश माेची (रामेश्वर काॅलनी), आकाश अरुण दहेकर (जाखनीनगर, कंजरवाडा), विशाल राजू अहिरे (मेस्काेमातानगर), शेख रफत शेख सलीम (कंजरवाडा), बिजासन फकिरा घुगे (मेहरूण), सनी उर्फ फाैजी बाळकृष्ण जाधव (रामेश्वर काॅलनी), मायकल उर्फ उमेश कन्हैया नेतलेकर (संजय गांधीनगर, कंजरवाडा), आकाश उर्फ खड्या सुकलाल ठाकूर (कासमवाडी), रवींद्र राजू हटकर (गवळीवाडा, तांबापुरा), खुशाल उर्फ काल्या बाळू मराठे, याेगेश उर्फ चपट्या राजेंद्र चाैधरी, विशाल मुरलीधर दाभाडे (तिघे रा. रामेश्वर काॅलनी), जुबेर यासिन खाटीक (तांबापुरा), सुनील रसाल राठाेड, ललित उमाकांत दीक्षित (दाेघे रा. कासमवाडी), संताेष उर्फ बब्या पाटील (कुसुंबा) या १८ जणांना समावेश आहे.