मुंबई : आपल्यापैकी अनेक जण धावपळीच्या जगात वावरत असताना स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा यांच्याकडे दुर्लक्ष करत असतात. बहुतेक वेळा कामाच्या नादात आपले छंद जोपासले जात नाही. हल्ली अनेकांना कामाचा तणाव मोठ्या प्रमाणावर जाणवत असतो.आपल्या आजूबाजूला असे काही लोक आपल्याला दिसतात, जे नेहमी कुठे ना कुठे फिरायला जात असतात. काहीजण ग्रुप सोबत फिरायला जातात तर काही जण सोलो ट्रीप देखील करतात. जर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातील बोरिंग गोष्टीला कंटाळलेला असाल, भविष्यात एखादी लॉंग ट्रिप प्लॅन करणार असाल तर ही ट्रीप चांगली घडावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. नेहमी घर आणि ऑफिस मॅनेज करत करत मनुष्य थकून जातो. आपला मेंदू फ्रेश करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग शोधत असतो. बहुतेक वेळा छोटीशी ट्रीप देखील आपल्या कामासाठी व आपल्या मूड फ्रेश होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते म्हणून अशावेळी काम करणाऱ्या लोकांना देखील एका ट्रिप ला जाणे गरजेचे आहे.अशा वेळी जर तुम्हाला कामातून काही वेळ ब्रेक हवा असेल किंवा कुठेतरी तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर आजच्या लेखामध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. लॉंग ट्रिप वेकेशनला जाताना आजच्या लेखामध्ये सांगितलेल्या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लाभदायक ठरणार आहेत. या टीप्स मुळे तुमचा प्रवास सुखकर होणार आहे व कोणत्याही अडचणी शिवाय तुम्हाला तुमचा प्रवास प्रवासाचा आनंद घेता येणार आहे, चला तर मग जाणून घेऊया ट्रॅव्हल्स ट्रीप बद्दल.
बजेटनुसार डेस्टिनेशन ठरवा
लॉंग ट्रीप ला जाताना आधी आपले बजेट नेमके काय आहे आणि त्यानंतरच बजेट नुसार कोणते ही डेस्टिनेशन ठरवा. भारतामध्ये अशा अनेक जागा आहेत, जेथे तुम्ही कमी बजेट मध्ये देखील मनसोक्त फिरू शकता. तुम्हाला डोंगर-दऱ्यात फिरणे आवडत असेल,समुद्र पाहणे आवडत असेल तर अशा वेळी तुमच्या पसंतीनुसार तुम्ही एखादे ठिकाण अवश्य निवडू शकता. वातावरण नुसार तुमचे डेस्टिनेशन ठरवा, जेणेकरून तेथे गेल्यावर तुम्हाला वातावरणाचा मनसोक्त आनंद घेता येईल.
आधी करा तिकीट बुक
कुठे फिरायला जाण्या आधी प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाची असते. जर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर अशावेळी डेस्टिनेशनचे तिकीट न विसरता आधी बुक करा. जर तुम्हाला ट्रेन ने जायचं असेल, फ्लाईटने जायचे असेल तर अशा वेळी 1-2 दोन महिने आधीच तिकीट बुक करून ठेवा अन्यथा भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही दिवसांपूर्वी तिकीट बुक केल्याने पैशाची बचत देखील होते. जर आपण ऐन वेळेवर तिकीट बुक केले तर अतिरिक्त पैसे देखील मोजावे लागतात. फ्लाईट बुकिंग करताना काही ट्रॅव्हल बुकिंग साइट्स अवश्य भेट द्या कारण की या वेबसाइट्सवर तुम्हाला काही प्रमाणात डिस्काउंट देखील मिळू शकतो.
हॉटेल / राहण्याचे ठिकाण
जास्त दिवसांसाठी बाहेर गेल्यावर सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे आपले राहण्याचे ठिकाण किंवा हॉटेल. आपण ज्या ठिकाणी मुक्काम करणार आहोत ते हॉटेल सुरक्षित असणे गरजेचे आहे. बाहेर फिरायला जाण्या पूर्वीच काही ऑनलाईन हॉटेल बद्दल माहिती मिळवायला हवी. तेथील रिविव्ह वाचायला पाहिजे. राहण्याचे ठिकाण आरामदायक असायला पाहिजे त्यासोबतच तुम्ही फिरायला जाणाऱ्या ठिकाणपासून जास्त लांब नसायला हवे अन्यथा तुमचा जास्त वेळ हॉटेल प्रवास करण्यातच जाईल.
आधी चौकशी करा
कोणत्याही ठिकाणावर फिरायला जाताना आपण काही ठराविक दिवसांसाठी फिरायला जात असतो अशा वेळी तिथे गेल्यावर सर्व ठिकाणी फिरणे शक्य होत नाही म्हणूनच आपल्याला ज्या ठिकाणी फिरायला जायचं आहे तेथील प्रेक्षणीय स्थळाबद्दल आधीच माहिती करून घ्यायला हवी. आपण ज्या जागेवर जाणार आहोत तेथील आजूबाजूचा परिसर देखील माहिती असणे गरजेचे आहे, अन्यथा प्रवासात गोंधळ निर्माण होऊ शकतो. लॉन्ग ट्रीप ला जाण्या आधी एक लिस्ट तयार करून ठेवा. जेणेकरून लिस्ट च्या मदतीने तुम्ही मनसोक्त फिरू शकाल. डेस्टीनेशन ठिकाण मधील हॉटेल, रेस्टॉरंट, राहण्याचे ठिकाण ,आजूबाजूचा परिसर,तेथील माणसे याबद्दल आधी माहिती काढून ठेवा.
फिरण्याचे साधन
कोणत्याही जागेवर फिरण्यासाठी कोणकोणती साधने उपलब्ध आहे याबद्दल देखील आधी चौकशी करायला हवी. जर प्रवास करतांना बस, रेल्वे – ट्रेन या व्यतिरिक्त कोणती साधने उपलब्ध असतील तर याचा देखील विचार करून ठेवायला हवा. तुम्ही लाँग ट्रीपसाठी जाणार असाल तर अशा वेळी ट्रॅव्हल, ब्लॉग, वेबसाईट किंवा जवळील व्यक्तींना याबद्दलची माहिती विचारायला हवी जेणेकरून तुम्हाला प्रवास करताना वेगवेगळे साधनांची माहिती देखील मिळू शकेल. या सगळ्या गोष्टींच्या आधारे तुम्हाला बजेटचा एकंदरीत अंदाज देखील येईल.