
मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये असा फोन पवारांना आला होता. मात्र या फोननंतर सुद्धा शरद पवारांनी हा नियोजित दौरा पूर्ण केला आहे.
सकाळी कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली होती. मात्र, त्या धमकीच्या फोननंतरही शरद पवारांनी आपला दौरा कायम ठेवत सकाळी कुर्डुवाडी येथील दौरा पूर्ण केला. फोन करणारी व्यक्ती कोण आहे आणि ही धमकी त्याने का दिली?, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.




















