नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गणेशोस्तव काळात सोने चांदीच्या दारात प्रंचड घसरण दिसून आली होती. पुढे येणाऱ्या नावरात्रोस्त्व व विजया दशमीच्या मुहूर्तावर सोने व चांदीच्या भावात मोठी वाढ होत असल्याचे जाणवत आहे. मात्र आज सोने चांदी दराच्या घसरणीला ब्रेक लागला असून तेजी दिसून येत आहे. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,950 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,130 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 572 रुपये आहे. शातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई – 50,510 रुपये
दिल्ली – 50,290 रुपये
हैदराबाद – 50,130 रुपये
कोलकत्ता – 50,020 रुपये
लखनऊ – 50,290 रुपये
मुंबई – 50,130 रुपये
नागपूर – 50,130 रुपये
पूणे – 50,130 रुपये
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.