• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उबेरचालकाने दिली मराठी अभिनेत्रीला धमकी ; अभिनेत्रीने केले आवाहन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 16, 2022
in क्राईम, मनोरंजन, राज्य
0
उबेरचालकाने दिली मराठी अभिनेत्रीला धमकी ; अभिनेत्रीने केले आवाहन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १६ ऑक्टोबर २०२२ 

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मनवा नाईकला एका वेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. तिनं तो प्रसंग सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यावर तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्या पोस्टवरुन आता महिलांसाठी रात्रीच्यावेळी कोणतं शहर सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्यावरुन विचारला आहे. मनवानं देखील आपल्याबाबत जे घडलं ते इतरासोबत होऊ नये म्हणून चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एका उबेरवाल्यानं मनवाला दिलेली धमकी आणि तो प्रसंग अभिनेत्रीनं त्या पोस्टमधून व्हायरल केला आहे.

मुंबईसारख्या ठिकाणी रात्रीचा प्रवास महिलासाठी किती भीतीदायक असतो हे नेहमी कोणत्या न कोणत्या बातम्या किवा महिलाकडून एकायला मिळत असतो पण एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे मराठी अभिनेत्रीला एका उबेर चालकाने धमकी दिल्याची.

रात्रीचे सव्वा आठ वाजले असतील. मी उबेर बूक केली. तो ड्रायव्हर त्याच्या फोनवर बोलत होता. मी त्याला त्याबाबत सांगितलं की, असं करु नको. त्यानं बीकेसीवरचा तो सिग्नलही ब्रेक केला. त्यावेळी देखील मी त्याला म्हटलं हे असं करु नको. मात्र त्यानं काही ऐकलं नाही. अखेर त्याला वाहतूक पोलिसांनी थांबवलं आणि त्याचा फोटो काढला. तेव्हा त्यानं त्या वाहतूक पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा मी पुढे होत पोलिसांना म्हटलं जाऊ देत तुम्ही त्याचा फोटो काढून घेतला आहे. त्यानंतर मात्र त्या उबेरवाल्याची अरेरावी सुरु झाली. तो मलाच म्हणाला की, तू भरणार आहेस का 500 रुपय़े? मी त्याला म्हटलं की, तू फोनवर बोलत होता. त्यानंतर त्यानं मला थेट धमकीच दिली की, रुको तेरे को दिखाता… मी त्याला म्हटलं पोलीस स्टेशन चलो. मग त्यानं गाडी एका बीकेसीच्या एका वेगळ्याच अंधाऱ्या जागेत नेली. मी त्याला म्हटलं मला पोलीस स्टेशनला जायचे आहे. त्यानं पुन्हा माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतरही तो मला मारण्याची धमकी देतच होता.
त्या उबेरचालकाच्या उद्दामपणामुळे मी भांबावून गेले होते. त्यानं फार जोरात कार चालवली. अशावेळी मी ओरडले. तो आवाज ऐकून दोन दुचाकीस्वारांनी आणि एका रिक्षाचालकानं त्या कारला अडवलं. आणि माझी सुटका झाली. मी सुरक्षित आहे. मात्र थोडी घाबरलीही आहे. असं मनवानं आपल्या त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आतापर्यत त्या पोस्टवर शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत वाहनचालकाच्या उद्दामपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group