
जळगाव मिरर । १४ ऑक्टोबर २०२२
शहरातील एमआयडीसी परिसरातील एका कॉलनीतून १७ वर्षीय मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका कॉलनीतील १७ वर्षीय युवती १३ वीचे शिक्षण घेत होती. तिला दि १३ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास युवतीस तिच्या घरातून फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी युवतीच्या पालकांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसात धाव घेत दि १३ रोजी पहाटे अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी दीपक जगदाडे हे करीत आहेत.




















