जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२४
भुसावळ शहरातील एका २४ वर्षीय तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत गत ६ महिन्यांपासून भुसावळातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी मध्यरात्री भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील एका भागात राहणारी २४ वर्षीय तरूणीची रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील शुभम कोळी याच्याशी ओळख झाली. त्यानंतर शुभम कोळी याने तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत तिच्यावर गेल्या ६ महिन्यांपासून भुसावळ शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून अत्याचार केला. त्यानंतर या तरुणीसोबत लग्न करण्यास शुभम कोळी याने नकार दिला. या प्रकारानंतर तरूणीने थेट भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता संशयित शुभम शैलश कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि गणेश धुमाळ करत आहेत.