
जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२३
मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुलीजवळ एका 25 वर्षीय तरुणाला दि.८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून जबरदस्तीने मोबाईल ब्रेसलेट आणि पाच हजार दोनशे रुपये रोख लुटून पळ काढल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरीअक्रौत येथील रहिवासी आकाश निवृत्ती माळी (वय २५) हा चालक काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. दि.८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित आरोपी माया तायडेसह दोन अनोळखी इसमांनी आकाश माळी यांच्या हातातील मोबाईल व ब्रेसलेट बळजबरीने घेऊन जात असताना आकाश माळी याने त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला असता.
संशयित आरोपी माया याने कमरेला चाकू लावून त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण करून खिशातील 5200 रुपये बळजबरीने काढून घेतले याप्रकरणी आकाश माळी यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध 9 रोजी सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर भोई करीत आहे.