जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२३
अमळनेर तालुक्यातील इंद्रपिंप्री येथील तरुणाने आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्ज असल्याने या तरुणाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील इंदपिंप्री येथील चेतन जगदीश पाटील (वय २६) या तरुणाने ६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शेतातील आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस पाटील भानुदास पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करत आहेत. दरम्यान, चेतन पाटील यांच्या पश्चात विधवा आई असा परिवार आहे.