
पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील मोंढाळे येथील ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संदीप भिला पाटील (वय ३२) यांनी राहत्या घरात शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. ही माहिती मिळताच मुकुंदा पाटील यांच्यासह भटू मच्छिंद्र पाटील, समाधान रतिलाल पाटील, भटू महादेव पाटील, नंदलाल दादाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संदीप पाटील यांना कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी मुकुंदा पाटील यांच्या माहितीवरून पारोळा पोलिसांत मोंढाळे येथील अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




















