जळगाव मिरर | २६ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील गोपाल राजू भोई (वय ३२) या तरुणाचा बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना वर्धमान शाळेजवळ घडली असून याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागात गोपाल राजू भोई हा युवक आपले दोन भाऊ व आईसमवेत वास्तव्यास होता. तसेच ठेकेदारीचा व्यवसाय करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. बुधवारी रात्री जेवण करून तो दुचाकीने घराबाहेर निघाला होता. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास सावखेडा शिवारातील काशिनाथ पलोड शाळेच्या मागील बाजूस रेल्वेची धडक लागून गोपाल भोई याचा दुर्देवी मृत्यू झाला. घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळताच पोहेकॉ अनिल फेगडे व अनिल मोरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून गोपालचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आणण्यात आला. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर नातेवाईक जिल्हा रुग्णालय दाखल झाले. त्यांनी गोपालचा मृतदेह बघताच परिसरात मनलेहावणारा आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ अनिल फेगडे हे करीत आहे.