जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील एका परिसरातील ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील सुनिल मधुकर चौधरी (वय ३५) यांनी आपल्या राहत्या घरी दि.५ रोजी गळफास घेतल्याने त्याच्या नातेवाईकांना आढळून आल्यानंतर त्यांनी लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता दाखल केले असता. येथील सीएमओ डॉ.सचिन पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोकों.शांताराम पाटील करीत आहे.