
जळगाव मिरर | ८ ऑक्टोबर २०२४
बांधकामाच्या ठिकाणी स्वच्छतेचे काम करतांना तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून बांधकामाचे वेस्ट मटेरीयल खिडकीतून खाली फेकत होते. हे काम करतांना ५५ वर्षीय महिलेचा तोल जावून ती खाली कोसळून गंभीर जखमी झाली. ही घटना दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसीतील ई सेक्टरमध्ये घडली होती. याप्रकरणी रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी बांधकाम मालक व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात प्रमिलाबाई शंकर चव्हाण (वय ५५) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एमआयडीसीतील ई सेक्टरमधील बांधकामाच्या ठिकाणी मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम मालक धिरज युवराज महाजन आणि ठेकेदार उल्ताफ शेख उस्मान (दोन्ही रा जळगाव) यांनी सुरक्षेच्या हेतूने बांधकामाच्या ठिकाणी जाळी लावण्यात आलेले नाही. याठिकाणी प्रमिलाबाई चव्हाण या महिला दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता या बांधकामाच्या ठिकाणाच्या तिसऱ्या मजल्यावर साफसफाई करून वेस्ट मटेरियल खिडकीतून फेकत होत्या. ते काम करीत असतांना त्यांचा तोल जावून तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्या गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. प्रकरणी जखमी महिलेचे पती शंकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बांधकाम मालक धिरज युवराज महाजन आणि ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान दोन्ही राहणार जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहे.





















