जळगाव : प्रतिनिधी
राहत्या घरी उंदीर मारण्याचे औषध सेवन केल्याने शनीबाई सत्तार बारेला (वय ६०, रा. फुपणी, ता. जळगाव) या वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना २७ जुलै रोजी रात्री फुपणी येथे घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील फुपणी गावात शनीबाई बारेला या वृद्ध महिला वास्तव्यास होती. त्यांनी राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध सेवन केले. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. हा प्रकार कुटंबियांच्या लक्षात येताच वृद्धेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत शीनबाई यांना मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.
