चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना आज भर दिवसा पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी दुचाकीला लावलेली पिशवी हातचलाखीने लांबवली.
सदरील पिशवीत तीन लाखांची रोकड असून ही घटना शनिवारी चाळीसगाव शहरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या ठिकाणी हि घटना घडली याच परिसरातील काही ठिकाणी सीसीटीव्हीत हि घटना कैद झाली आहे. या संशयित आरोपीचा चाळीसगाव पोलीस कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील ओझर राजेंद्र तान्हीराम वाणी (वय ५७) हे चाळीसगाव शहरात कामानिमित्त आले होते त्यांनी आपल्या दुचाकीच्या मागील बाजूला पिशवीत तीन लाख रुपये ठेवले मात्र चोरट्यांनी ही पिशवी पाळत ठेवून लांबवली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, योगेश बेलदार आदी तपास करीत आहेत.




















