जळगाव मिरर । ३१ जानेवारी २०२३ ।
भुसावळात ३०० रूपयांच्या मोहापायी भुसावळ तालुक्यातील साकरी येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील साकरी येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी तक्रारदाराला उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रूपयांची लाच मागितली होती. तर संबंधीत व्यक्तीने या प्रकरणी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.या अनुषंगाने आज गायकवाड यांनी खडका येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराला बोलावून तीनशे रूपयांची लाच घेतांना त्यांना अटक करण्यात आली आहे.शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा सापळा पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाटील, नाईक ईश्वर धनगर, राकेश दुसाने, दिनेश पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर आदीच्या पथकाने यशस्वी केला.