जळगाव मिरर । ६ डिसेंबर २०२२
भडगाव शहरातील बस स्थानकावर एका अनोळखी व्यक्तीने एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बस स्थानकावर दि ३ रोजी दुपारच्या सुमारास राजश्री गणेश राजपूत (वय ३७) रा. पाटील वाडा चाळीसगाव हे बस स्थानकावर असतांना अनोळखी इसमाने यांच्या जवळील कापडी पिशवीतील ३० ग्राम वजनाचा सोन्याचा राणीहार चोरून नेल्याची घटना घडली आहे. हा हार तब्बल ९० हजार रुपये किमतीचा असून या प्रकरणी राजश्री राजपूत यांनी भडगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.विजय जाधव हे करीत आहेत.