जळगाव मिरर | १५ मे २०२४
महत्वाच्या मिटींसाठी शहरात आलेल्या डबल्यूएचओचे नाशिक विभागाचे टीबी ऑफिसर डॉ. हर्षद भाऊराव लांडे (वय ४३, रा. गोरवेल रोड, पोर्तुगीज चर्चजवळ, मुंबई) यांना भरधाव कारने धडक दिली होती. या अपघातात लांडे यांचा मृत्यू झाल्याची घटना दि. ८ मे रोजी रॉयल पॅलेस समोर घडली होती. रामानंद नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर धडक देणाऱ्या आशिष रविंद्र देशपांडे (वय ३५, रा. दांडेकरनगर) या कारचालकाच्या मुसक्या आवळलया असून त्याची कार देखील जप्त करण्यात आली आहे.
मुंबई येथील डॉ. हर्षद लांडे हे डब्ल्यूएचओ च्या नाशिक विभागाचे टीबी ऑफीसर म्हणून नोकरीला होते. बुधवार दि. ८ मे रोजी ते डब्ल्यूएचओच्या एका महत्वाच्या मिटींगसाठी ते जळगावात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी दिवसभर मिटींगला हजेरी लावली. त्यानंतर सहकाऱ्यासोंबत जेवण केल्यानंतर ते रात्री अकरा वाजेच्या सुमारास ते सागरपार्कजवळील एका हॉटेलमध्ये मित्राला भेटण्यासठी गेले होते. मित्राची भेट घेतल्यानंतर ते पुन्हा हॉटेलकडे जाण्यासाठी निघाले असता, काव्यरत्नावली – चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या (एमएच १९, ईजी १६६९) क्रमांकाच्या भरधाव कारने डॉ. लांडे यांना धडक दिली. या अपघातात लांडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या या गुन्ह्याचा तपास करीत असतांना तपासअधिकारी इरफान मलिक यांनी त्या फुटेजसह तांत्रीक विश्लेषणाच्या आधारावर कारचालक संशयित आशिष रविंद्र देशपांडे याला अटक सिव्हील इंजिनिअर असलेल्या तरुणाला केली. त्याच्याकडून अपघातातील कार देखील जप्त करण्यात आली आहे. कारसह चालकाला अटक केल्यानंतर त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अटकेतील संशयित आशिष देशपांडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.