
पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील पुनगाव रोडवरील गणपती नगर भागात प्रिया विनोद सुरवाडे (वय – २६) या विवाहितेने दि. ८ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान मयत प्रिया हिच्या भावाने प्रिया ही आत्महत्या करुच शकत तिचा घातपात झाला असावा असा संशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत तपासा अंती पती व एका विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रिया रमेश शहादेव हिचा विवाह दि. ३० आॅगस्ट २०२१ रोजी पाचोरा येथील पुनगाव रोडवरील गणपती नगर भागातील एम. एस. एफ. मध्ये कार्यरत असलेले विनोद राजु सुरवाडे यांचे झाला होता. लग्नानंतर प्रिया व विनोद यांच्यात किरकोळ कारणावरून नियमित भांडण होत असत. दरम्यान दि. ८ आॅगस्ट रोजी गणपती नगर भागातील राहत्या घरात पहाटेच्या सुमारास प्रिया हिचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मयत प्रिया हिचा भाऊ देवेन रमेश शहादेव यांना व्यक्त केला होता.
या अनुषंगाने पाचोरा पोलिसांनी तपास करत तपासा अंती प्रिया हिचा पती विनोद सुरवाडे व भोजराव खैरे यांचे विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा प्रिया हिचे वडिल रमेश भाऊराव शहादेव यांच्या फिर्यादीवरून नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया वसावे ह्या करीत आहे.




















