जळगाव मिरर । २६ ऑक्टोबर २०२२
बिग बॉस ओटीटीमधून ती पहिल्याच आठवड्यात बाहेर पडली होती. नेहमीच वादाच्या भौवरयात सापडणारी ‘बिग बॉस OTT’ फेम उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र तिला खरी ओळख घरातून बाहेर आल्यानंतर मिळाली. अभिनय किंवा चित्रपट नव्हे तर आपल्या अतरंगी फॅशन आणि स्टाईलमुळे उर्फी चर्चेत आली आहे. उर्फी दररोज हटके ड्रेस परिधान करून मीडियासमोर येत असते. ती कधी काचेपासून, कधी वायरीपासून कधी ब्लेडपासून तर कधी गोणपाटपासून बनलेले ड्रेस परिधान करून सर्वांनाच थक्क करत असते. काहींना तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटतं तर काही लोक तिला वाईटरित्या ट्रोल करत असतात. परंतु सध्या उर्फी जावेद एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. उर्फी सध्या कायदेशीर अडचणीत सापडताना दिसून येत आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण.
एका व्यक्तीने उर्फीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने उर्फीवर तिच्या नवीन गाण्यात अतिशय लहान आणि अयोग्य ड्रेस घातल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल केला आहे. उर्फीने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी अभिनेता रणवीर सिंग कायदेशीर अडचणीत सापडला होता. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट करत खळबळ माजवली होती. एका प्रसिद्ध मासिकासाठी रणवीरने हे फोटोशूट केलं होतं. रणवीरचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाले होते. समाजात अश्लिलता पसरवत असल्याचा आरोप करत काही संघटनांनी रणवीर विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र रणवीरने आपले काही फोटो मॉर्फ केल्याचा दावा केला होता.त्यानंतर आता उर्फी आपल्या गाण्यामुळे अडचणीत सापडताना दिसून येत आहे.
उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून आपल्या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. गेल्या 11 ऑक्टोबरला उर्फी जावेदचा ‘हाय हाय ये मजबुरी’ हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याची प्रचंड चर्चा झाली होती. सोशल मीडियावर या गाण्याचे अनेक रील्स आणि व्हिडीओसुद्धा तयार झाले होते. स्वतः उर्फीने अनेक सोशल मीडिया स्टार्ससोबत आपल्या गाण्याचं प्रमोशन करत रील्स तयार केले होते. या गाण्याला सोशल मीडियावर 85 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं काहींना प्रचंड आवडलं आहे. तर काहींनी या गाण्याला ट्रोल केलं आहे. दरम्यान आता आपल्या याच गाण्यामुळे उर्फी अडचणीत सापडली आहे. या गाण्यामुळेच उर्फीविरोधात तक्रार दाखल केली आहे.