जळगाव मिरर | १७ नोव्हेबर २०२३
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका मोबाइल दुकानदाराला दोन जणांनी चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनी परीसारातील रहिवासी सुमित वसंतलाल वलबानी ( वय ३१) हा तरुण मोबाइल दुकान लावून आपला उदरनिर्वाह करत असतो. मंगळवारी रात्री सुमित बलबानी हा त्याच्या घरासमोर उभा होता. रात्रीच्या वेळेस कॉलनीत दोघे फिरत होते. त्यावेळी विनाकारण काय फिरता, असे सुमितने विचारले. याचा राग आल्याने संशयित आरोपी आर्यन पवार (वय २१ रा. शनिपेठ) आणि नामिर खान (वय २३) या दोघांनी चॉपरने वार करून सुमितला जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर सुमितला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.