यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचाळे येथील शेतमजूर याने साखळी शिवारातील शेतावरील बांधावर असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काल दि. ५ रोजी दुपारी निदर्शनास आला. यावरून यावल पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चुंचाळे येथील सतीश शेनफडू पाटील (वय ३५) याने काल दि. ५ रोजी दुपारी बारा ते एक वाजेचे सुमारास साखळी शिवारातील उज्जैन सिंग राजपूत यांचे शेतातील बांधावरील निंबाच्या झाडाला दोरीने गडफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. हे मोराळा येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी खबर दिल्यावर तात्काळ मयताचे कुटुंब तिथे धावले. यावल पोलिसात मयताचा भाऊ योगेश कृष्णा पाटील यांनी खबर दिलाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताचे पश्चात पत्नी दोन लहान मुली मुलगा आई-वडील असा परिवार आहे.