
जळगाव मिरर । १४ ऑक्टोबर २०२२
शहरातील दादावाडी परिसरातून गीर जातीची गाय अज्ञाताने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील दादावाडी परिसरातील मुख्य महामार्गाजवळ असलेले राजस्थान स्विट मार्टच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून दिलीप लुंबगिरी गोस्वामी यांच्या मालकीची गीर जातीची लाल रंगाची 15 हजार रुपये किंमत असलेली गाय अज्ञाताने दि.8 रोजी मध्यरात्री खुट्याच्या दोरी काढून चोरुन नेल्याची घटना घडली असून त्यानंतर मालकाने परिसरत इतरत्र ठिकाणी गायीचा शोध घेतला असता, गाय मिळून न आल्याने दि.13 रोजी तालुका पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.नरेंद्र पाटील हे करीत आहेत.




















