जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२४
देशभर नव्या वर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वच मंडळी मोठी तयारी करीत असतांना जळगाव शहरातील अनेक हॉटेलधारक या ३१ डिसेंबरसाठी जय्यत तयारी करीत असतांना शहरातील काही हॉटेलधारकांनी मनपाची परवानगी न घेताच हॉटेल सजवीत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.
येणाऱ्या ३१ डिसेंबरसाठी जळगाव शहरातील अनेक परिसरात हॉटेलधारकांनी मोठ मोठ्या हॉटेल सजविले आहे. मात्र अनेक ठिकाणी मनपाची कुठलीही परवानगी नसताना देखील हॉटेलचा मोठा डोलारा उभा केला आहे. याबाबत काही ग्राहकांची देखील तक्रारी समोर आल्याने हॉटेलधारकांचे धाबे दणाणले आहे. यावर मनपाचे अधिकारी कारवाई करणार कि या हॉटेलधारकांच्या पाठीमागे खंबीर उभे राहणार याकडे देखील पाहणे महत्वाचे राहणार आहे.