जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२४
जामनेर येथे बहिणीकडे गेलेल्या मंगलाबाई संजय गोपाळ (४०, रा. पिंप्राळा) यांच्या बंद घराची खिडकी तोडून अज्ञात चोरट्याने घरातून सोने चांदीचे दागिने तसेच एलईडी टीव्ही असा एकूण २१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला. ही घटना २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगलाबाई गोपाळ या २४ नोव्हेंबर रोजी जामनेर येथे बहिणीकडे गेल्या होत्या. त्यामुळे घर बंद होते. ही संधी साधत चोरट्याने बंद घराची खिडकी तोडून १० हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही, सोने-चांदीचे दागिने असा एकूण २१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. २ डिसेंबर रोजी मंगलाबाई या घरी आल्या त्यावेळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकों जितेंद्र राठोड करीत आहेत.