जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील न्यू महालक्ष्मी मोटर गॅरेज येथे गुरुवारी रात्री ८.२० वाजेच्या सुमारास दुरुस्ती सुरू असलेल्या मारोती ओम्नी (क्र.एमएच.१९-क्यू.५६ ३८) या गाडीने पेट घेतला. या गाडीत गॅस किट होते. कार पेटल्याची माहिती मिळताच पालिका अग्निशमन केंद्राचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी घटनास्थळ गाठून आगविझवण्यासाठी मदतकार्य सुरू केले. दुकानाच्या मागे असलेले दोन घरगुती गॅस सिलिंडर सुद्धा घटनास्थळापासून तातडीने दूरनेण्यात आले. यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीमुळे गॅरेजचे सुद्धा नुकसान झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या ओम्नीच्या गॅसकीटची नळी लीक होती. त्यामुळे दुरुस्तीसाठी ही गाडी दुपारपासून गॅरेजवर लावली होती. दुरुस्तीदरम्यान गाडी सुरू करताच आगीचा भडका उडाला. आग लागल्याचे निदर्शनास येताच या धावपळ झाली.
