जळगाव मिरर | ३ नोव्हेबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीचा जोरदार कहर सुरु झाला असून जळगाव जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष चाळीसगाव विधानसभा मतदार संघावर लागले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतर्फे विद्यमान आ.मंगेश चव्हाण व महाविकास आघाडीतर्फे माजी खा.उन्मेष पाटील यांच्यात संघर्ष होणार असून यासाठी सर्वच उमेदवारांनी प्रचार सुरु केला आहे. तर यात आ.मंगेश चव्हाण हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरले आहे.
आ.मंगेश चव्हाण यांच्या पहिल्याचं ‘टर्म’ मध्ये चाळीसगाव शहरात विकासाची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या टर्ममध्ये स्मार्ट प्रगतीचा निर्धार करत आहे. चाळीसगाव शहरातील नागरिकांचा या निर्धाराला प्रचंड प्रतिसाद मिळत असून चाळीसगावच्या स्मार्ट विकासासाठी नागरिक शुभेच्छा देत आहेत.
दि.२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवनेरी हॉटेल चौक, तेली गल्ली, गोट्या मारुती, रथगल्ली, कुरेशी वाडा, जुनी नगरपालिका,देशमुख वाडा, बाजारपेठ, देवी गल्ली, व्ही टी लेन, आडवा बाजार, सोनार गल्ली, अफू गल्ली, बाराभाई मोहल्ला, धनगर गल्ली, देशपांडे गल्ली, देशमुख गल्ली, नदी किनारा, घाट रोड व्यापारी मंडळ,श्री संताजी जगनाडे महाराज चौक घाट रोड या भागातील नागरिकांशी संवाद संवाद साधत कमळ या निशाणी समोरील बटन दाबून मला पुन्हा एकदा निवडून देण्याची विनंती केली.