
जळगाव मिरर | २८ मे २०२५
राज्यातील अनेक शहरातून आयुष्य संपविल्याच्या घटना समोर येत असतांना आता नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगगड परिसरातील शितकड्यावरून उडी घेत युवकासह विवाहितेने जीवनयात्रा संपवल्याची घटना मंगळवारी (दि. 26) घडली. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वणी येथील युवक अदित्य संजय देशमुख (२7) व फोपशी येथील मोनिका किसन शिरसाठ (२4) या दोघांनी शितकड्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या दोघांचे मृतदेह भातोडा शिवारात गडाच्या दक्षिण बाजूस आढळून आले. ही घटना सोमवारी (दि. २६) दुपारी २ ते २.३० च्या सुमारास घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. भातोडे येथील पोलिसपाटील विजय राऊत यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, मोनिका शिरसाठ बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाइकांनी यापूर्वीच वणी पोलिसांत दाखल केली होती. वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.