
जळगाव मिरर | २१ मे २०२५
यावल तालुक्यातील महेलखेडी येथील माहेर असलेल्या विवाहितेला घेऊन तिचे पती दुचाकीद्वारे महेलखेडी गावाला जात होते. दरम्यान विरावली गावाजवळ विवाहितेने दुचाकी थांबवायला सांगितली आणि शेतातील विहिरीत धावत जाऊन उडी घेतली. हा प्रकार निदर्शनास येताच पतीने आरडाओरड केली व नागरीकांनी धाव घेत विवाहितेला विहिरीतून काढून यावल रुग्णालयात आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विवाहितेच्या माहेरील लोकांनी मात्र तिच्या पतीनेच तिला विहिरीत ढकलल्याचा आरोप केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील महेलखेडी या गावातील सासर असलेल्या मुस्कान अल्ताफ तडवी (वय २०) या विवाहितेला दुचाकी वर घेऊन तिचे पती अल्ताफ रहेमान तडवी रा. महेलखेडी ता. यावल हे गावी जात होते. दरम्यान विरावली गावाच्या जवळ शेत गट क्रमांक ५७ येथे विवाहितेने पतीला दुचाकी थांबवण्याचे सांगितले आणि ती दुचाकी उतरून थेट शेतातील हा प्रकार तिच्या पतीने पाहून आरडा ओरड केली. नागरिकांनी तेथे धाव घेऊन विवाहितेला विहिरीतून बाहेर काढले व यावल ग्रामीण रूग्णालयात आणले.
यावल ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर सदर विवाहितेला तिच्या पतीनेचे तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरील लोकांनी केला आहे. पुढील तपास डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.




















