
जळगाव मिरर / २८ डिसेंबर २०२२
अमळनेर शहरातील एका परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी अमळनेर पोलिसात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, एका भागातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. २६ डिसेंबर सोमवार रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास गावातील विजय बारकू भिल याने अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले, असा संशय मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. या संदर्भात मुलीच्या आईने अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी विजय बारकू भिल याच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.





















