
चाळीसगाव : कल्पेश महाले
जळगाव जिल्ह्यातील अनेक गावातून अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याची घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच चाळीसगाव शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.१ नोव्हेबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शाळेतून घरी परत आली नसल्याने परिवारातील सदस्यांनी शाळेसह इतर ठिकाणी पाहणी व विचारपूस केली असता मिळून न आल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने चाळीसगाव पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तापस सपोनि.दीपक बिरारी हे करीत आहेत.