
चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव शहरातील एका परिसरातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस एकाने पळवून नेल्या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एका परिसरातून दि. २५ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बाहेर जाते सांगून गेली असतात ती पुन्हा घरी परत आली नाही त्यामुळे परिवारातील सदस्यांनी तिचा शोध घेतला असतात ती सापडून न आल्याने परिवाराला एकावर संशय असल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.विशाल टकले हे करीत आहेत.