
भडगाव ः प्रतिनिधी
शाळेला विद्येचे घर म्हटले जाते पंरतु काही वाईट प्रवृत्तीची लोक आजही समाजात वावरत असताना चुकीचे काम करून शाळेचे व माणुसकीचे नाव बदनाम करण्यात आजही आहेत. अशीच एक घटना आज भडगाव तालुक्यात घडली आहे. अवघ्या १६ वर्षीय मुलीचा हात पकडून विनयभंग केला आहे. भडगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात कुटूंबासमवेत राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आज दि.6 ऑक्टोबर 2022 रोजी शाळेचा जिना उतरत असतांना मुलीचा हात पकडून माझ्या सोबत चल असे बोलून व अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी मैत्रीणीसोबत जात असतांना मुलीच्या मागे जात शिट्टया वाजवित मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न असे कृत्य करून व मुलीने घरी जावून आजीला सर्व हकीकत सांगीतली असता आजीने संशयित आरोपीस समजविण्यासाठी गेली असता तर आजीलाही अश्लिल भाषेत शिवीगाळ केली असल्याने याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन भडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि . चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.




















