जळगाव मिरर | २९ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा जाब विचारणार्या परिवाराला मारहाण केल्याची घटना उघडकीस आलेलं आहे. याप्रकरणी याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात बाप-लेकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगरातील खान्देश मिल कॉलनी परीसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह बांधकामाच्या ठिकाणी रहिवासास असून याच परीसरातील मीत सुनील पटेल, चेतन सुनील पटेल हे दोघे काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलीची अश्लिल हावभाव करीत छेड काढत असल्याचा आरोप आहे. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडीता रस्त्याने घरी जात असतांना संशयीत मित सुनील पटेल आणि चेतन पटेल हे दोघांनी तिला आवाज देवून जवळ बोलाविले. नंतर तिचा हात पकडून विनयभंग केला.
पीडीत मुलीने हाताला झटका मारून घर गाठत हा प्रकार कुटुंबाला सांगितला. याचा जाब विचारण्यासाठी पीडीत मुलीचे आई-वडील गेले असता संशयित मीत पटेल, चेतन पटेल व त्यांचे वडील सुनील पटेल व त्यांचा अनोळखी एक मित्राने वडीलांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच मुलीच्या आईच्या अंगावर विटांनी मारहाण केली. या मारहाणीत कुटूंबीय जखमी झाले. याप्रकरणी पीडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा जिल्हापेठ पोलिसात मीत सुनील पटेल, चेतन सुनील पटेल, सुनील पटेल आणि एक अनोळखी अशा चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.