जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३
राज्यात गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुलीसह विवाहित महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कुठेही थांबायचे नाव घेत नसून नुकतेच आर्वी तालुक्यातील एका गावात रात्रीच्या एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून दारू पाजत एकाने बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. आर्वी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आर्वी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्वी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी १७ वर्षीय मुलीला अशपाक आणि शुभम नामक तरुणांनी कारमध्ये जबरदस्तीने बसवलं. तिला गावाबाहेरील रस्त्यावर नेत कारमध्येच बळजबरीने दारु पाजली. नंतर दोघांपैकी एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती मुलीने पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि आर्वी पोलिसांचे एक अशी दोन पथके आरोपींच्या मार्गावर आहेत. लवकरच या आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक काळे यांनी सांगितले.