
भुसावळ ः प्रतिनिधी
तालुक्यातील सुनसगाव येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात एका अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस 19 सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तालुक्यातील आपल्या नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता परंतु ती कुठेही मिळून न आल्याने अखेर भुसावळ तालुका पोलिस स्थानकात मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक अमोल पवार करीत आहेत.




















