जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२५
महिनाभराची सुट्टी घेऊन आलेल्या सीमा सुरक्षा दलातील जवान दीपक अशोक निकम (वय ३८, रा. ममुराबाद, ता. जळगाव) या जवानाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येपूर्वी जवानाने मिसळ आणण्यास पाठवले, आई मिसळ घेवून घरी येताच तिला मुलाचा मृतदेह दिसून आला. मृतदेह दिसताच आईने हृदयपिळवून टाकणारा आक्रोश केला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे घडली.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे दीपक अशोक निकम हे कुटुंबियांसह वास्व्यास होते. दीपक निकम हे २०१५ पासून सीमा सुरक्षा दलात सेवा बजावत होते. महिनाभराची रजा टाकून ते दहा दिवसांपुर्वीच दीपक हे रजेवर आपल्या गावी आले होते. सोमवारी सकाळी उठल्यानंतर दीपक काही वेळ गावात गेला, त्यानंतर सकाळी ८ वाजता घरी आल्यानंतर आईला गावातील हॉटेलमधून मिसळ आणायला सांगितली. आई मिसळ घ्यायला गेल्यानंतर घरी कोणीही नव्हते. त्यावेळी मधल्या घरात जाऊन दीपकने गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळानंतर आई मिसळ घेऊन, घरी परतल्यानंतर दरवाजा लावलेला दिसला. दरवाजा उघडताच समोर दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह बघताच आईने हंबरडा फोडला. यावेळी शेजारच्यांसह व दीपकचे नातेवाईकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी लागलीच दीपकला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दीपकला मयत घोषित केले.
दीपक यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांसह मित्रमंडळीने तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती. तसेच त्याच्या कुटुंबियांकडून मनहेलावणारा आक्रोश केला जात होमता. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दीपकच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. दीपकच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले