जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२४
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून जवळच असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरी फाट्याच्या पुढे ढाब्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला छोटा हत्ती टॅम्पोने भरधाव वेगात धडक दिल्याने चालकासह अन्य एक जण जखमी झाल्याची घटना १६ रोजी सकाळी ७ वाजता घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, महामार्गावरील एकनाथ पहिलवान यांच्या ढाब्याच्या अलीकडे दर्यापूर शिवारात ट्रक (एमएच – ४०, बीजी- ४१५६) हि रस्त्याच्या खाली उभी होती. तर मुक्ताईनगरकडून येणाऱ्या छोटा हत्ती हा टॅम्पो (एमएच ४९ ऐटी- ५९७३) ने या ट्रकला जबर धडक दिली. यात जामनेर तालुक्यातील मालदाभाळी येथील राहणारे टेम्पो चालक विक्की प्रताप सस्ते (वय २५) त्याचा सोबत असलेला शुभम गोपाल बागुल्या (वय २८) हे दोघे जखमी झाले आहेत.
टॅम्पोने भरधाव वेगात समोर उभ्या असलेल्या ट्रकला मागच्या बाजुने जबर धडक दिल्याने जखमी झालेला चालक विक्की सस्ते व शुभम बागुल्या यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी अमरावती येथील जयश्रीराम नगरमध्ये राहणाऱ्या ट्रकचालक विनोद सुकदेव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास वरणगाव पोलिस करत आहेत.