
जळगाव मिरर / २९ एप्रिल २०२३ ।
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नागपूरमधून अशीच एका दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर एक गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्याच्या रामटेक जवळील आमडी फाट्यावर हा भीषण अपघात झाला आहे यात एकाच कुटूंबातील तिघांना जीव गमवावा लागला आहे. ज्यामध्ये भरधाव ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांना उडवल्याचे समोर आले आहे. या अपघातात आई,वडील आणि मुलीचा जागीच मृत्यु झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भयंकर अपघाताच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या फाट्यावर वारंवार अपघात झाल्याचे समोर येत असून या ठिकाणी अंडरब्रिजची मागणी करण्यात येत आहे. या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बहतुक कोंडी झाली होती. दरम्यान दिवसेंदिवस अपघातांच्या संखेत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.






















