जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२५
धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. धुळ्याहून जळगावकडे दुचाकीने जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने एमएच १९ सीई १७१९ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
सविस्तर वृत्त असे कि, या दुर्घटनेत दीपक मोतीलाल भामरे (४५) व पन्नालाल भगवान वर्मा (दोघे रा. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. मात्र त्यांच्या झालेल्या तीव्र दुखापतीमुळे दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवले. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




















